'ये रात और ये दूरी...' म्हणत मानसी नाईकने नवऱ्यासाठी बनवला स्पेशल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 19:41 IST2021-06-02T19:40:45+5:302021-06-02T19:41:30+5:30

मानसी नाईकचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Saying 'Yeh Raat Aur Yeh Doori ...', Mansi Naik made a special video for her husband | 'ये रात और ये दूरी...' म्हणत मानसी नाईकने नवऱ्यासाठी बनवला स्पेशल व्हिडीओ

'ये रात और ये दूरी...' म्हणत मानसी नाईकने नवऱ्यासाठी बनवला स्पेशल व्हिडीओ

बघतोय रिक्षावाला या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रीय आहे.  नेहमी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने तिचा नवरा प्रदीप खरेरासाठी बनवला आहे. 

मानसी नाईक हिने इंस्टाग्राम व्हिडीओ शेअर करत म्हटले की, माझा नवरा लांब गेल्यावर माझी अशी होईल अवस्था. हा व्हिडीओ माझ्या नवऱ्यासाठी बनवला आहे. या व्हिडीओत मानसी नाईक नाइट सूटमध्ये अंदाज अपना अपना चित्रपटातील ये रात और ये दूरी या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर तिचा नवरा प्रदीपने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, मला हा व्हिडीओ आवडला. पाहून मजा आली. 


मानसी नाईक सध्या चित्रपटात काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चर्चेत येत असते. 


मानसी नाईक बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत जानेवारी महिन्यात लग्नबेडीत अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर हे जोडपे वाटेवरी मोगरा या म्युझिक अल्बममध्ये झळकले होते.

मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने नृत्याविष्कार दाखवला आहे.तसेच तिने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

Web Title: Saying 'Yeh Raat Aur Yeh Doori ...', Mansi Naik made a special video for her husband