सायली संजीवच्या मादक अदांमुळे हिट झाला होता हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 15:04 IST2020-01-31T15:02:28+5:302020-01-31T15:04:40+5:30

सायलीने आजवर मालिकांमध्ये अतिशय सोज्वळ, संस्कारी मुलीची भूमिका साकारली आहे. मात्र तिच्या याच प्रतिमेला छेद देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Sayali sanjeev video with sushant shelar | सायली संजीवच्या मादक अदांमुळे हिट झाला होता हा व्हिडिओ

सायली संजीवच्या मादक अदांमुळे हिट झाला होता हा व्हिडिओ

ठळक मुद्देअभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सुशांत शेलार यांच्यावर या व्हिडीओतील गाणं चित्रीत करण्यात आले होते. यात सायलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता.

काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा आज वाढदिवस असून तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे. सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. तिला स्वतःला पॉलिटिकल सायन्समध्ये प्रचंड रस होता. तिला पॉलिटिकल अ‍ॅनालिसिस्ट बनायचे होते. पण कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत तिने काम केले आणि त्या एकांकिकेसाठी तिला राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला. त्या एकांकिकेला प्रवीण तरडे परीक्षक म्हणून आले होते. तू स्क्रिनवर छान दिसशील, ऑडिशन्स दे असे ते तिला म्हणाले आणि या एकांकिकेमुळे तिचा अभिनयप्रवास सुरू झाला. तिने सुरुवातीच्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केले. प्रियांका चोप्रासोबतदेखील ती एका जाहिरातीमध्ये झळकली होती. त्यानंतर तिला पोलिसलाइन या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

सायलीने आजवर मालिकांमध्ये अतिशय सोज्वळ, संस्कारी मुलीची भूमिका साकारली आहे. मात्र तिच्या याच प्रतिमेला छेद देणारा एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. ‘मी बावरी’ या गाण्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता.

अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सुशांत शेलार यांच्यावर या व्हिडीओतील गाणं चित्रीत करण्यात आले होते. यात सायलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता. साडी परिधान केलेल्या सायलीच्या मादक अदा यात पाहायला मिळाल्या होत्या. या अदा रसिकांना चांगल्याच आवडल्या होत्या. पण सायलीचा हा अंदाज तिच्या काही चाहत्यांना रुचला नव्हता. कारण या व्हिडीओतील सायलीच्या मादक अदांना अनेकांनी निगेटिव्ह कमेंट देखील दिल्या होत्या.

Web Title: Sayali sanjeev video with sushant shelar