ठरलं तर, या तारखेला सायलीच्या लग्नाचा 'बस्ता' येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 07:15 IST2020-02-05T07:15:00+5:302020-02-05T07:15:00+5:30

अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

Sayali Sanjeev New Marathi Movie Basta | ठरलं तर, या तारखेला सायलीच्या लग्नाचा 'बस्ता' येणार रसिकांच्या भेटीला

ठरलं तर, या तारखेला सायलीच्या लग्नाचा 'बस्ता' येणार रसिकांच्या भेटीला

सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सायलीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. या लूकमध्ये तिचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. सायलीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली आहे.  पण हा फोटो तिच्या आगामी सिनेमाचा एक लूक आहे. लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार "बस्ता" चित्रपटातून ३ एप्रिलला   प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. 

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असून सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी "बस्ता" चित्रपट ची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे. 

मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे.  अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही. 

Web Title: Sayali Sanjeev New Marathi Movie Basta