मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये बोल्ड अवतार, 'पूल टाईम' म्हणत शेअर केला Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 02:30 PM2023-05-28T14:30:54+5:302023-05-28T14:32:08+5:30

टेलिव्हिजनमध्ये बराच काळ काम केल्यानंतर ती आता चित्रपटांकडे वळली आहे.

sayali sanjeev marathi actress shared photo wearing bikini near swimming pool | मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये बोल्ड अवतार, 'पूल टाईम' म्हणत शेअर केला Photo

मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये बोल्ड अवतार, 'पूल टाईम' म्हणत शेअर केला Photo

googlenewsNext

मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्याची आघाडीची अभिनेत्री. टेलिव्हिजनमध्ये बराच काळ काम केल्यानंतर ती आता चित्रपटांकडे वळली आहे. नुकताच तिचा 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाचं आणि सायलीच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. नेहमी सोज्वळ रुपात दिसणाऱ्या सायलीचा आता एक बोल्ड फोटो व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सायली संजीव 'काहे दिया परदेस' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. सायलीला आजपर्यंत प्रेक्षकांनी कायम साध्या आणि सोज्वळ रुपातच बघितलं आहे. पण आता सायलीचा थेट बिकिनी घातलेला फोटो सध्या चर्चेत आहे. सायली 'कैरी' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली आहे. लंडनमध्ये वेळ घालावतानाचे अनेक क्षण तिने कॅमेऱ्यात कैद केले आहेत. त्यातलाच एक क्षण म्हणजे स्विमिंग पूल जवळ बसलेला तिचा एक फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकीनी घातलेली दिसतेय. 'इट्स पूल टाईम' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट असा हा फोटो आहे. 

सायलीने हा फोटो पोस्ट केला नसून स्टोरी ठेवली आहे. तरी तिचा हा फोटो बघून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असणार. सायलीचा 'कैरी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचं शूट लंडनमध्ये सुरु आहे. शशांक केतकर आणि सिद्धार्थ जाधवही या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Web Title: sayali sanjeev marathi actress shared photo wearing bikini near swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.