सावनी रविंद्रने बॉलिवूडच्या 'या' गायकासोबत गायलं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 06:30 IST2019-07-02T06:30:00+5:302019-07-02T06:30:00+5:30

गायिका सावनी रविंद्र नुकतंच ‘सदानन्नू नडिपे’ या तेलगु चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.

Savaniee ravindra sing with armaan malik for telugu movie | सावनी रविंद्रने बॉलिवूडच्या 'या' गायकासोबत गायलं गाणं

सावनी रविंद्रने बॉलिवूडच्या 'या' गायकासोबत गायलं गाणं

ठळक मुद्देसावनी रविंद्रने तमिळ सिनेसृष्टीत 20हून अधिक गाणी गायली आहेत

गायिका सावनी रविंद्र नुकतंच ‘सदानन्नू नडिपे’ या तेलगु चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. सावनीने बॉलिवूडचा सुप्रसिध्द गायक अरमान मलिक याच्यासोबत गाणं गायलं आहे. तेव्हा अरमान मलिक हा सावनी रविंद्रचा 'बर्थडे ट्विन्स' असल्याचा उलगडा सावनीला झाला आणि मग त्यांची भेट अविस्मरणीय झाली.

सावनी रविंद्रने तमिळ सिनेसृष्टीत 20हून अधिक गाणी गायल्यावर आता ती ‘सदानन्नूनडिपे’ मधून पहिल्यांदाच तेलगु सिनेमामध्ये गाणे गायले आहे. ह्या सिनेमात पार्श्वगायनाची संधी कशी मिळाली, ह्याचा किस्सा सावनी सांगते, “नान सोलवा हे गाणे मी संगीतकार शुंभकर शेंबेकर सोबत गायले आहे. हे तमिळ गाणे सदानन्नूनडिपे ह्या तेलगु सिनेमाच्या निर्मात्यांनी ऐकल्यावर त्यांनी शुंभकरला असे एक गाणे ह्या सिनेमासाठीही संगीतबध्द करायचा आग्रह धरला. ते गाणे ही मी आणि शुभंकरनेच गायला हवे, असाही त्यांचा आग्रह होता.”

अरमान मलिकशी झालेल्या भेटीसोबत सावनी रविंद्र सांगते, “शुभंकर आणि माझ्या डुऐट गाण्याशिवायही एक सोलो गाणे ह्या सिनेमासाठी मी गायले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळीच माझी आणि अरमानची भेट झाली. अरमानचे ही एक सोलो गाणे ह्यामध्ये आहे. अरमानशी झालेल्या पहिल्याच भेटीत आम्ही खूप गप्पा मारल्या. यावेळी आमचा दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येत असल्याचे आम्हाला उमगले.”

Web Title: Savaniee ravindra sing with armaan malik for telugu movie