सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:33 IST2025-06-30T12:32:55+5:302025-06-30T12:33:18+5:30

सौरभ आणि अनुजानेदेखील मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुजाने याबाबत खुलासा केला आहे. 

Saurabh Gokhale and Anuja Sathe dont want child said we love animal more | सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."

सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे सौरभ गोखले आणि अनुजा साठे. आज कित्येक तरुण पिढीतील कपल लग्नानंतर मुल न होऊ देण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. सौरभ आणि अनुजानेदेखील मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुजाने याबाबत खुलासा केला आहे. 

अनुजाने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला "तू आणि सौरभने जाणीवपूर्वक मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अनुजा म्हणाली, "हो, आम्हाला प्राणी खूप जास्त आवडतात. आता आमच्याकडे चार कुत्रे आहेत. अजून चार असतील तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ती मुलंच आहेत आमची आणि आम्ही त्यांना आमच्या मुलांप्रमाणेच ट्रीट करतो. माझ्यात मातृत्वाची भावना नाहीये का, असं विचारशील तर नक्कीच आहे. पण, मुलांसाठी नाही तर प्राण्यांसाठी आहे. आज मला बॅकफूटवर जावं लागणार आहे. बाकी कोणालाही फरक पडणार नाही. पण, माझ्यावर परिणाम होणारे". 

"मी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. हे फक्त करिअरच्या बाबतीत नाहीये. पण, बाकी सगळ्या गोष्टीतही आहे. आज मूल आहे म्हणून मला या चार गोष्टी कराव्याच लागतील किंवा मला आर्थिकदृष्ट्या प्रेशर येणारे. कारण, आजकाल काहीच स्वस्त नाहीये. आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या शिक्षणाला काहीच पैसे लागले नाहीत. पण आज ज्या रेटने गोष्टी महाग झाल्यात. ती मोठी झाल्यावर काय होणार ते सोडा. आता लहान मुलांच्या गोष्टीही किती महाग आहेत. त्यामुळे मला त्या मुलाला या जगात आणायची इच्छा नाही...आणि सगळंच कॉम्प्रोमाइज...हे मला पटत नाही. आणि माझ्यात मुलांसाठी ती मातृत्वाची भावना नाहीये. हा एक मुद्दा आहे", असंही अनुजा म्हणाली. 

Web Title: Saurabh Gokhale and Anuja Sathe dont want child said we love animal more