मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बांधणार लग्नगाठ?, म्हणाला-'ती' माझ्या आयुष्यात आलीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 10:57 IST2022-09-26T10:41:54+5:302022-09-26T10:57:19+5:30

अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लग्नाची हिंट दिली आहे.

Santosh Juvekar will tie the knot?, actor post viral | मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बांधणार लग्नगाठ?, म्हणाला-'ती' माझ्या आयुष्यात आलीये

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बांधणार लग्नगाठ?, म्हणाला-'ती' माझ्या आयुष्यात आलीये

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर(Santosh juvekar). 'झेंडा', 'मोरया', ' रेगे' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. दमदार अभिनयामुळे चर्चेत असणार संतोष सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मित्रांनो अचनाक खूप मोठी आणि खूपच आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडतेय जिची मी आतुरतेनं वाट पाहत होतो. 'ती' माझ्या आयुष्यात आलीये आणि ज्याबद्दल तुम्हीही मला सतत विचारायचे की 'कधी सत्या कधी?'. तर मित्रांनो आमचं सगळं ठरलंय आणि मुहुर्तही ठरलाय. आता तुमच्या सोबत आनंद शेअर करायचाय. म्हणून उद्या भेटूयात 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता फेसबुक आणि 7 वाजता इन्स्टाग्रामवर लाइव्हवर. नक्की यायचं हं, आग्रहाचं आमंत्रण.

पुढे संतोष लिहितो, ही post बघून तुमच्या मनात नक्कीच एक विचार आलाय आणि जो आलाय तो अगदी योग्य आहे
उद्या तुम्ही, मी आणि आणि आणि................ म्हं.......!!! बघू आणि कोण आहे ते direct भेटावतोच ना live येताय नं उद्या संध्याकाळी ६ वाजता #facebook live आणि ७ वाजता #instagram live ला? याच वाट पहातोय. संतोषची पोस्ट बघून चाहते त्याला लग्न ठरलं का असा प्रश्न विचारतायेत. शहनाई चा आवाज ऐकून दोन सेकंदासाठी असं वाटलं की भाई च लग्न ठरलंय का काय??, मला नाही वाटत दादा तू इतक्या लवकर लग्न करशील, नक्की काहीतरी वेगळा आहे!!तुझ्या करीयरची रिलेटेड काही असणार, लग्न करताय की काय????? अशा कमेंट्स चाहते त्याच्या या पोस्टवर करतायेत.  आता नक्की संतोष कशाबाबत बोलतोय हे आपल्या लवकरच कळेल. 

Web Title: Santosh Juvekar will tie the knot?, actor post viral