संतोषने दिवाळी फॅमिलीसोबत का साजरी केली नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 15:32 IST2016-11-01T15:32:50+5:302016-11-01T15:32:50+5:30

प्रत्येकजण दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत होते. कोणी एकमेकांना शुभेच्छा देवून तर कोणी फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटत होते. ...

Santosh did not celebrate Diwali with family? | संतोषने दिवाळी फॅमिलीसोबत का साजरी केली नाही?

संतोषने दिवाळी फॅमिलीसोबत का साजरी केली नाही?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">प्रत्येकजण दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत होते. कोणी एकमेकांना शुभेच्छा देवून तर कोणी फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटत होते. प्रत्येकाचे घर हे रांगोळी, लाइटिंग व पणत्यांच्या प्रकाशानी उजळून निघाले होते. आशा या आनंदाच्या क्षणी साहजिकच प्रत्येकाला वाटते की, हा उत्सव आपल्या फॅमिलीसोबत साजरा करावा. असेच काही अभिनेता संतोष जुवेकरला देखील जाणविले आहे. कारण प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याला यंदाची दिवाळी ही फॅमिलीसोबत साजरी करण्यास मिळाली नाही याची खूप खंत वाटत आहे. म्हणूनच ही दिवाळी संतोषने आपल्या फॅमिलीसोबत का साजरी केली नाही? याविषयी लोकमत सीएनएक्सने जाणून घेतले आहे. संतोष सांगतो, माझ्या फॅमिलीला सोडून मी पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहे. याविषयी मला खूप वाईट वाटत आहे. मी यंदा चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे दिवाळी पुण्यातच साजरी केली आहे. या दिवसांमध्ये आई, बाबा व संपूर्ण फॅमिलीची खूप आठवण येत होती. दिवाळीला फॅमिलीसोबत नसलो तरी, मी या दिवसांमध्ये काम करत होतो. या गोष्टीचा आनंददेखील आहे. ही दिवाळी मी सेटवरच साजरी केली आहे.माझ्या सहकलाकार, आर्टिस्ट व फिल्मच्या ़युनिटबरोबर या सणाचा आनंद लुटला आहे. तसेच काही वेळ मित्रांसोबतदेखील घालविला आहे. शेवटी हे लोकदेखील आपल्याला फॅमिलीसारखेच असतात ना. संतोषने यापूर्वी झेंडा, एक तारा, फक्त लढ म्हणा यासारखे अनेक चित्रपट केले आहे. तसेच सध्या तो अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतदेखील पाहायला मिळत आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याची दिवाळी मात्र कभी खुशी, कभी गममध्ये साजरी झाली असे म्हणावे लागेल. 

Web Title: Santosh did not celebrate Diwali with family?