उलाला...! ग्रीन ड्रेसमधील संस्कृती बालगुडेच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना केलं मदहोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 13:36 IST2021-02-13T13:30:05+5:302021-02-13T13:36:54+5:30
Glamorous photo's shared by Sanskruti Balgude : या फोटोंमधील संस्कृतीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.

उलाला...! ग्रीन ड्रेसमधील संस्कृती बालगुडेच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना केलं मदहोश
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. याशिवाय ती या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. संस्कृती बालगुडे हिने इन्स्टाग्रामवर ग्रीन कलरच्या शॉर्ट ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोत संस्कृती खूपच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसतेय. या फोटोंमधील संस्कृतीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.
संस्कृतीचा 'धरला माझा हात' हा म्युझिक व्हिडीओ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडेच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. धरला माझा हातच्या व्हिडीओची निर्मिती व्हिडीओ पॅलेसने केली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे.
संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.