मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या फोटोंची भुरळ पडली फॅन्सना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 14:09 IST2020-01-29T14:04:55+5:302020-01-29T14:09:03+5:30

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे

Sanskruti balgude share her new photoshoot on social media | मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या फोटोंची भुरळ पडली फॅन्सना

मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या फोटोंची भुरळ पडली फॅन्सना

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.


मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकतेच तिने निळ्या रंगाच्या टॉपमध्ये फोटोशूट केले आहे. संस्कृतीचे सोज्वळ सौंदर्य तिच्या फॅन्सनादेखील भावला आहे. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.


संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sanskruti balgude share her new photoshoot on social media