या मराठी अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट होतंय सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 13:18 IST2019-12-09T13:13:33+5:302019-12-09T13:18:31+5:30

संस्कृती बालगुडेच्या सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

Sanskruti balgude share her new photoshoot | या मराठी अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट होतंय सोशल मीडियावर व्हायरल

या मराठी अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट होतंय सोशल मीडियावर व्हायरल

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नेहमीच आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते.याच फोटोंच्या यादीत संस्कृतीच्या आणखी एका नव्या फोटोंची भर पडली आहे. संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय.   


पिवळ्या रंगाच्या जमसूटमध्ये संस्कृती खूपच हॉट दिसतेय. यात तिने विविध पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.. तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. 


संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sanskruti balgude share her new photoshoot