आलिया, कतरिनाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटोशूट पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 11:08 IST2020-01-14T11:03:54+5:302020-01-14T11:08:08+5:30

तिने नुकतेच साडीत फोटोशूट शेअर करत सगळ्यांना क्लीन बोल्ड केले.

Sanskruti balgude share her beautiful saree photoshoot | आलिया, कतरिनाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटोशूट पाहा!

आलिया, कतरिनाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटोशूट पाहा!

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र तिने नुकतेच साडीत फोटोशूट शेअर करत सगळ्यांना क्लीन बोल्ड केले.  संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप ग्लॅमरस आणि ब्युटीफुल दिसतेय. हा फोटो शेअर करून संस्कृतीने ..देखती है जिस तराह से तेरी नज़रें मुझे , मैं खुद को चुपाउ कहाँ..?! असं कॅप्शन दिले आहे.


'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.


या सिनेमात संस्कृती बालगुडे व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sanskruti balgude share her beautiful saree photoshoot