Vikram Gokhale Death : विक्रम साहेबांनी 'संक्रमण'ला रंग लावला, संकर्षण कऱ्हाडेने सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 11:50 AM2022-11-27T11:50:34+5:302022-11-27T11:59:22+5:30

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही विक्रम गोखले साहेबांची आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. गोखले साहेब असे का म्हणतोय संक्रषण ते त्याने पोस्ट मध्ये सांगितले आहे.

sankarshan-karhade-shared-memory-of-late-vikram-gokhale-on-the-movie-set-khopa | Vikram Gokhale Death : विक्रम साहेबांनी 'संक्रमण'ला रंग लावला, संकर्षण कऱ्हाडेने सांगितली आठवण

Vikram Gokhale Death : विक्रम साहेबांनी 'संक्रमण'ला रंग लावला, संकर्षण कऱ्हाडेने सांगितली आठवण

googlenewsNext

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी हळहळली आहे. विक्रम गोखले यांच्यासोबत ज्यांना ज्यांना काम करता आले, त्यांचे काम जवळून अनुभवता आले, त्यांच्याकडुन शिकता आले असे कलाकार त्यांच्या आठवणी, भावना व्यक्त करत आहेत. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही विक्रम गोखले साहेबांची आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. गोखले साहेब असे का म्हणतोय संकर्षण ते त्याने पोस्ट मध्ये सांगितले आहे.

संकर्षण कऱ्हाडे म्हणतो, “आणि विक्रम गोखले साहेबांनी चक्कं मला रंग लावला हो ..”🥺🙏🏻मी विक्रम गोखले सरांना “गोखले साहेब” असं म्हणतो.. आणि ते कधीच मला संकर्षण म्हणाले नाहीत.. “संक्रमण” म्हणायचे..
खोपा नावाच्या एका सिनेमात ते माझे आजोबा होते.. गुंडांसोबतच्या मारामारीत मला जबर जखम होते.. ती जखम दाखवण्यासाठी केलेला मेक अप त्यांना “खरा वाटत नव्हता..” ते म्हणाले, सगळ्यांना माहीती आहे.. सिनेमातली जखम खोटीच असते.. पण ती “खरी वाटली पाहिजे “ .. आणि त्यांनी स्वत: माझा मेक अप केला हो .. 🥺🙏🏻 आरसा दाखवला..
ह्याच सिनेमातली अजुन एक आठवण सांगतो ;
काही सिन्स (scenes) त्यांना लिखाणात आवडले नव्हते .. म्हणुन मी ते rewrite केले . तर साहेबांनी vanity van मध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्यांना बोलवून सांगीतलं कि , “ह्या मुलाला credits मध्ये विशेष सहाय्य म्हणुन नाव द्या अन्यथा त्याचे पैसे द्या ..” 🙏🏻
हि सगळी कित्ती थोर असल्याची लक्षणं आहेत.. कुठलाही कलाकार त्याच्या कला गुणांइतकाच त्याच्या सोबतच्या सिनियर्स मुळे घडतो.. माझं भविष्यात काही चांगलं झालं तर; त्यात
“गोखले साहेबांचा ही मोठ्ठा वाटा असेल .. “
गोखले साहेब .. आठवण येत राहील ..

विक्रम साहेबांचा थोरपणा, त्यांची हुशारी, माणुसकी, एकंदर त्यांचा दबदबा किती होता हे संकर्षण ने 'खोपा' या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी जवळून पाहिले. त्यांची आठवण प्रत्येकालाच कायम येत राहणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे त्यांच्यासाठी एक कुटुंबच होतं. इथे कोणालाच त्रास होऊ नये म्हणुन ते कायम मदत करत राहिले. उतारवयात कलाकारांचे हाल व्हायला नको म्हणून अशा कलाकारांसाठी त्यांनी आश्रम देखील सुरु केले होते. असे होते विक्रम गोखले.

Web Title: sankarshan-karhade-shared-memory-of-late-vikram-gokhale-on-the-movie-set-khopa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.