वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:38 AM2024-04-06T11:38:13+5:302024-04-06T11:38:45+5:30

संकर्षणचं नाटक पाहायला आली रिंकू राजगुरु. संकर्षणने तिच्या भेटीचा खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (rinku rajguru, sankarshan karhade)

Sankarshan karhade post on special experience with Rinku's visit to Akluj to watch a play | वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव

वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणचं नियम व अटी लागू नाटक पाहायला सैराट फेम रिंकू राजगुरु आलेली. त्यावेळी तिच्या भेटीचा अनुभव संकर्षणने सांगितलाय. संकर्षण रिंकू आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो पोस्ट करुन लिहिलंय की,  "काल अकलूजचा प्रयोग जोरदार झाला . प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतीसाद मिळाला almost Houseful होता…. आणि काल प्रेक्षकांमध्य् स्पेशल गेस्ट पण होती…. रिंकू राजगुरू."

रिंकूबद्दल संकर्षण पुढे म्हणाला,  "मी अकलूज ला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरांत तुझं स्वागत आहे .. शहरांत काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली..” आई बाबांना घेउन आली.. प्रयोग पाहून हसली , रडली , कौतुक करुन गेली.. तीचा सैराट आला तेंव्हा “आम्ही सारे खवय्ये” मध्ये पाहूणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली."

संकर्षण शेवटी लिहितो, "आता चांगले चांगले सिनेमे करते… लोकप्रियता तर काय विचारायलाच नको …. पण तरीही स्वतःहून कळवून , येउन , भेटून, विचारपुस करुन, कौतुक करुन गेली.. आणि विशेष म्हणजे “मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत “खवय्ये” मध्ये असं पण म्हणाली.. छान वाटलं, ह्या सगळ्या तीच्या वागण्या बोलण्यात शांतता , स्थीरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती …. वचवच, माज , नखरे काही नाही… Thank you रिंकू तुला खूप शुभेच्छा भेटत राहु..
आणि हो सग्गळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कल्लाकारांचे …. त्यांच्या मनांत एकच भाव होता… “आरची आली आरची."

Web Title: Sankarshan karhade post on special experience with Rinku's visit to Akluj to watch a play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.