संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:50 IST2024-04-27T16:49:58+5:302024-04-27T16:50:30+5:30

Sanju Rathod : कलाविश्वात आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणजे संजू राठोड. त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याचे 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहे.

Sanju Rathod's song 'Gulabi Saree' appeared on 'New York Times Square' | संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर

संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर

 कलाविश्वात आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणजे संजू राठोड (Sanju Rathod). त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचे 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहे. या गाण्यावर सामान्य लोकांसह सेलिब्रेटीही थिरकले आहेत. आनंदाची बाब म्हणजे 'गुलाबी साडी' हे मराठी गाणं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकलं आहे. 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ला.

यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की, गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करताना हे इतके यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढे यश मिळाले यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी  मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझे गाणे झळकले. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. 

चाहत्यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही...

माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळे शक्य झाले ते माझ्या चाहत्यांमुळे. त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही.अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन, असे संजू राठोड म्हणाला.

'गुलाबी साडी'ला 'यूट्यूब'वर  मिळाले ७० मिलियन व्ह्यूज 
'गुलाबी साडी' या गाण्याला 'यूट्यूब'वर ७० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर 'स्पॉटीफाय'वरही या गाण्याने १५ मिलियनचा टप्पा पार केला आहे.तसेच 'यूट्यूब'वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणाऱ्या व्हिडीओंमध्ये आणि 'स्पॉटीफाय'च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये 'गुलाबी साडी' गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Sanju Rathod's song 'Gulabi Saree' appeared on 'New York Times Square'