संजय दत्त करणार 'ह्या' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:05 IST2018-10-30T14:52:51+5:302018-10-30T15:05:21+5:30

संजय दत्तने स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Sanjay Dutt to debut in Marathi film industry | संजय दत्त करणार 'ह्या' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

संजय दत्त करणार 'ह्या' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

ठळक मुद्देसंजय दत्तचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पणसंजय दत्तच्या सिनेमात दीपक डोबरियाल व नंदिता धुरी मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमध्ये गेल्या दोन दशकांपासून काम करणाऱ्या अभिनेत्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. या अभिनेत्यांच्या यादीत सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार यांची नावे असून या यादीत आता आणखीन एक नाव सामील होणार आहे. ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त.संजय दत्तने स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द त्यानेच सोशल मीडियावर केली आहे.

संजय दत्तने इंस्टाग्रामवर क्लॅप बोर्डचा फोटो शेअर करून सिनेमातील एका दृश्याचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बालकलाकारासोबत अभिनेत्री नंदिता धुरी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता दीपक डोबरियाल दिसतो आहे. या फोटोंसह संजय दत्तने लिहिले की,' संजय दत्त प्रोडक्शन अंतर्गत पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती करतो आहे, हे सांगताना खूप आनंद होत आहे. अद्याप सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करीत असून या सिनेमाचे दिग्दर्शन राज गुप्ता करणार आहेत. यात दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी व आर्यन मेघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे'.


संजय दत्त निर्मिती करीत असलेल्या सिनेमाचे शीर्षक व कथा अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्री नंदिता धुरीने संजय दत्तची पोस्ट शेअर करीत लिहिले की, 'इतक्या चांगल्या प्रोजेक्टची भाग असल्याचा मला खूप आनंद आहे.'


संजय दत्तने मराठी चित्रपटाची निर्मिती करीत मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. त्याची निर्मिती असलेला पहिलावहिला सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. 

Web Title: Sanjay Dutt to debut in Marathi film industry