रजनीकांत यांच्या जावयालाही भावले मराठी सूर,या सिनेमासाठी गायलं गाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:17 IST2018-03-23T09:47:23+5:302018-03-23T15:17:23+5:30

काही वर्षांपूर्वी वाय दिस कोलावरी कोलावरी डी असा प्रश्न विचारत त्यानं संगीत रसिकांना अक्षरशा वेड लावलं. त्याच्या सूरांवर लहानथोर ...

Sangeet sang, sung by Rajinikant for his music | रजनीकांत यांच्या जावयालाही भावले मराठी सूर,या सिनेमासाठी गायलं गाण

रजनीकांत यांच्या जावयालाही भावले मराठी सूर,या सिनेमासाठी गायलं गाण

ही वर्षांपूर्वी वाय दिस कोलावरी कोलावरी डी असा प्रश्न विचारत त्यानं संगीत रसिकांना अक्षरशा वेड लावलं. त्याच्या सूरांवर लहानथोर आपसुकच थिरकू लागले आणि वाय दिस कोलावरी कोलावरी डी असं विचारु लागले. प्रत्येकावरच जणू काही या कोलावरी डी गाण्याने मोहिनी घातली होती. ही मोहिनी घालणारा गायक होता धनुष. दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई अशी ओळख असणा-या धनुषने कोलावरी डी म्हणत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.दक्षिणेत धनुष तसा परिचित होताच मात्र कोलावरी डी या गाण्यामुळे जगभरातील रसिकांना त्याची वेगळी गायक म्हणूनही ओळख झाली. आता हाच धनुष गायक म्हणून आपल्या कक्षा विस्तारणार आहे. धनुष मराठी सिनेमासाठी गाणे गाण्यासाठी सज्ज झाला आहे. फ्लिकर या मराठी सिनेमात धनुषच्या सूरांची जादू मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.प्रसिद्ध संगीतकार इलाया राजा यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. धनुष पहिल्यांदाच मराठी गाणं गाणार असल्याने त्याचे बोल काहीसे सोपे आणि सहज उच्चारता येतील असे ठेवण्यात आले आहेत. धनुषनेही मराठी गाणं गाण्यासाठी तितकीच मेहनत घेतली आहे.मराठी भाषेचे धडे त्याने घेतले आहेत. शिवाय मराठी शब्दांचा उच्चारही तो शिकला आहे.दोन दिवसांचा रियाज करुन अखेर त्याने गाणे रेकॉर्ड केले आहे. सुपरस्टार रजनीकांत हेसुद्धा लवकरच पसायदान या सिनेमातून मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहेत.आपल्या सासरेबुवांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा जावई धनुषसुद्धा आपल्या सूरांनी मराठी रसिकांवर जादू करण्यासाठी सज्ज झाला आहे. वाय दिस कोलावरी डी या धनुषच्या गाण्याला रसिकांनी डोक्यावर घेतले तसंच ते त्याच्या पहिल्या मराठी गाण्यावरही थिरकणार का, धनुषचे सूर मराठी रसिकांच्या काळजाला भिडणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे.अंजलीचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आॅस्करला पाठविल्यानंतर अंजली जबरदस्त लाइमलाइटमध्ये आली आहे. त्यातच ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करीत असल्याने अंजलीचे नशीब ‘सातवे आसमान पे’ असेच म्हणावे लागेल. असो, अंजलीने तिच्या आगामी तामीळ ‘काला’ या चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केले. अंजलीने म्हटले की, ‘काला या चित्रपटात काम करण्यास केवळ याकरिता होकार दिला की, यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भूमिका आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा आपण भाग बनत आहोत, याच विचाराने मी या चित्रपटाला होकार दिला आहे. 

Web Title: Sangeet sang, sung by Rajinikant for his music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.