'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:31 IST2025-11-22T11:29:30+5:302025-11-22T11:31:40+5:30
लग्नाच्या पाच वर्षांतच या अभिनेत्रीने घेतला होता घटस्फोट, त्यानंतर आता दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ

'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
'संगीत देवभाबळी' नाटकातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने सप्टेंबर, २०२५ मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत विभक्त होत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान आता अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधते आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमधून ती लग्न करत असल्याचं समजतं आहे.
शुभांगी सदावर्ते लवकरच दुसऱ्यांदा लग्नागाठ बांधते आहे. ती प्रेमाची गोष्ट मालिकेचा निर्माता सुमित म्हशीलकरसोबत लग्न करते आहे. नुकतेच त्या दोघांच्या मित्रांनी केळवणाचं आयोजन केलं होतं. त्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत जुळली गाठ गं असं कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने त्यांच्या मित्रांचे आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
वर्कफ्रंट
शुभांगीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिनं 'संगीत देवबाभळी' या नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तिने नाटकासोबतच 'लक्ष्य', 'नवे लक्ष्य' या मालिकेत काम केले आहे. तसेच 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमामध्येही ती झळकली आहे.