संदीप पाठक करणार व्हिडीओ पार्लर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 15:46 IST2016-07-15T10:16:56+5:302016-07-15T15:46:56+5:30

Exculsive - बेनझीर जमादार विनोदी असो या भावनिक अभिनय आपल्या कलेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा संदीप पाठक हा लवकरच आपल्याला ...

Sandeep Pathak will do a video parlor | संदीप पाठक करणार व्हिडीओ पार्लर

संदीप पाठक करणार व्हिडीओ पार्लर

ong>Exculsive - बेनझीर जमादार

विनोदी असो या भावनिक अभिनय आपल्या कलेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा संदीप पाठक हा लवकरच आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार  आहे. संदीप पाठक  हा प्रसाद नामजोशी यांच्या व्हिडीओ पार्लर या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची मदार माझ्या एकटयावर असल्याचे संदीपने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. या चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाले असल्याचे देखील त्याने सांगितले. पण या चित्रपटाची काय कथा असणार आहे हे अजून गुलदस्त्यातच असल्याचे संदीपने सांगितले. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा व्हिडीओ पार्लर हा चित्रपट आहे. प्रसाद नामजोशी यांच्या पहिला चित्रपट रंगापतंगा मध्ये देखील संदीप होता. आता तो थेट, त्यांच्या व्हिडीओ पार्लर या दुसºया चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात कल्याणी मुळे, गौरी कोंग या कलाकारांचा देखील समावेश आहे. प्रसाद नामजोशी यांच्या रंगापतंगा या चित्रपटाने बॉक्सआॅफीसवक प्रचंड यश मिळविले होते. त्यामुळे साहजिकच प्रसाद नामजोशी यांचा दुसरा चित्रपट कोणता असणार आहे ही चर्चा होती. आज या चर्चेला लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून फुलस्टॉप लागणार आहे. 
 

Web Title: Sandeep Pathak will do a video parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.