सलमान आणि रितेशचा पुन्हा लय भारी पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 13:29 IST2016-07-17T07:59:56+5:302016-07-17T13:29:56+5:30

बॉलीवुडचा सुलतान सलमान खान व अभिनेता रितेश देशमुख या दोघांचा पुन्हा लई भारी पाहायला मिळणार आहे. हो, सलमान पुन्हा ...

Salman and Ritesh will see the rhythm again | सलमान आणि रितेशचा पुन्हा लय भारी पाहायला मिळणार

सलमान आणि रितेशचा पुन्हा लय भारी पाहायला मिळणार

लीवुडचा सुलतान सलमान खान व अभिनेता रितेश देशमुख या दोघांचा पुन्हा लई भारी पाहायला मिळणार आहे. हो, सलमान पुन्हा एकदा रितेशसोबत मराठी चित्रपटात झळकणार आहे. सलमान खानने एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी चित्रपट भूमिकेबद्दल बोलता बोलता म्हणाला,  या चित्रपटातील माझं शूटिंग पाच-सहा दिवसांत आटपेल आणि त्याचा निमार्ता रितेश आहे, हे एक बरं आहे, असं सलमान म्हणाला. मी हा चित्रपट करण्यासाठी स्वत:च्या मनाची समजूत घातली. मला माहित आहे, मी काय करत आहे. तुम्ही पाहालच असं देखील सलमान म्हणतो. सलमानची आई सलमा खान मराठी शिकायला मदत करणार का, असा प्रश्न त्याला विचारताच सलमानने नकारार्थी मान डोलावली. संवादलेखक आणि रितेशच माझी मदत करतील. माझी आईची मराठी हिंदी आणि इंग्रजी मिश्रित आहेअसं म्हणत त्याने हास्याची लकेर उमटवली. रितेशची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख तिच्या मुंबई फिल्म कंपनी बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Web Title: Salman and Ritesh will see the rhythm again