सखी गोखले दिसली स्टनिंग लूकमध्ये, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 12:16 IST2019-09-23T12:10:20+5:302019-09-23T12:16:21+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले.

Sakhi gokhale share her stunning photo on instagram | सखी गोखले दिसली स्टनिंग लूकमध्ये, चाहते झाले घायाळ

सखी गोखले दिसली स्टनिंग लूकमध्ये, चाहते झाले घायाळ

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यानंतर ती दिल दोस्ती दोबारा या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत झळकली.

अभिनेत्री सखी गोखले सध्या लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली आहे. मात्र तरीही सखी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. लंडनच्या रस्त्यांवरचा फोटो सखीने शेअर केला आहे. या फोटोत सखी खूपच स्टनिंग दिसतेय.

सीखचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखील आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे.  


गेल्या एप्रिल महिन्यात सखी अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. २०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली.

या मालिकेत काम करत असतानाच सुव्रत व सखी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलू लागल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी या वृत्ताला कधीच दुजोरा दिला नाही. काही दिवसांपूर्वी सुव्रतचा जेवण बनवतानाचा फोटो सखी गोखलेने सोशल मीडियावर शेअर करून सुलाचा स्वयंपाक असा हॅशटॅगही दिला. या फोटोत सुव्रत मन लावून जेवण बनवताना दिसत होता.

Web Title: Sakhi gokhale share her stunning photo on instagram