​सैराटची आता लंडनपर्यंत मजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 12:08 IST2016-06-23T06:38:12+5:302016-06-23T12:08:12+5:30

संपूर्ण भारतात सैराटमय झालेल्या आर्ची-परशाच्या जोडीने आता लंडनमधील नागरिकांना आपल्या अभिनयाने याड लावायला सुरूवात केली आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांना ...

Sairat now to London | ​सैराटची आता लंडनपर्यंत मजल

​सैराटची आता लंडनपर्यंत मजल

पूर्ण भारतात सैराटमय झालेल्या आर्ची-परशाच्या जोडीने आता लंडनमधील नागरिकांना आपल्या अभिनयाने याड लावायला सुरूवात केली आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांना झिंगाट करुन सोडणारा ‘सैराट’ आता लंडनमध्ये ९ जुलैला रिलीज होणार आहे. सैराट रिलीज झाल्यापासून नवनवे विक्रमांचे इमले रचतोय. या चित्रपटाने ९० कोटीहून अधिक कमाई करत विक्रमाचा नवा उच्चांक गाठलाय. हा चित्रपट १०० कोटींच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय. 

Web Title: Sairat now to London