साडीमध्ये खुलून आलंय रिंकू राजगुरूचे सौंदर्य, हा फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 18:29 IST2019-05-11T18:28:04+5:302019-05-11T18:29:08+5:30

रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे.

Sairat fame Rinku Rajguru looking very beautiful in her Instagram picture | साडीमध्ये खुलून आलंय रिंकू राजगुरूचे सौंदर्य, हा फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

साडीमध्ये खुलून आलंय रिंकू राजगुरूचे सौंदर्य, हा फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

ठळक मुद्देया फोटोत रिंकूने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे. साडीला साजेशे असे तिने ट्रेडिशनल दागिने घातले असून चंद्रकोरची टिकली लावली आहे. ती या रूपात खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. 

सैराटला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर घराच्या बाहरे पडणे देखील तिला शक्य होत नव्हते. एवढेच काय तर शाळेत जाताना देखील लोक गर्दी करत असल्याने तिने शाळा सोडून प्रायव्हेट शिक्षण घेणे पसंत केले. रिंकूला पहिल्याच चित्रपटात मिळालेली लोकप्रियता अनेकांना अनेक चित्रपटानंतर देखील अनुभवता येत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

रिंकूचे अनेक फॅन्स असून ते सोशल मीडियावर देखील तिला फॉलो करतात. रिंकूचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता चार वर्षांहून देखील अधिक काळ झाला आहे. रिंकूने सोशल मीडियावर आपले अकाऊंट सुरू करावे ही तिच्या चाहत्यांची चार वर्षांपासूनची इच्छा आहे. पण रिंकूने सोशल मीडियापासून दूर राहाणेच पसंत केले होते. मात्र गेल्यावर्षी तिने तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले. तिच्या या अकाऊंटला अल्पावधीतच खूप चांगले फॉलोव्हर्स मिळाले आहेत. सध्या ३३ हजाराहून अधिक तिचे फॉलोव्हर्स असून तिने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत केवळ ५४ पोस्ट टाकल्या आहेत. रिंकू तिच्या इन्स्टाग्रामवर खूपच कमी अॅक्टिव्ह असते हे यावरून दिसून येत आहे. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 

रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे. साडीला साजेशे असे तिने ट्रेडिशनल दागिने घातले असून चंद्रकोरची टिकली लावली आहे. ती या रूपात खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 

Web Title: Sairat fame Rinku Rajguru looking very beautiful in her Instagram picture