रिंकू राजगुरूच्या कुटुंबियांचा फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:30 IST2019-11-06T06:30:00+5:302019-11-06T06:30:01+5:30

रिंकूने नुकताच तिच्या कुटुंबियाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि भाऊ यांना आपल्याला पाहायला मिळत आहे.

Sairat fame rinku rajguru family picture | रिंकू राजगुरूच्या कुटुंबियांचा फोटो तुम्ही पाहिला का?

रिंकू राजगुरूच्या कुटुंबियांचा फोटो तुम्ही पाहिला का?

ठळक मुद्देया फोटोत तू खूपच सुंदर दिसत असून तुझ्या कुटुंबियांना पाहून आम्हाला आनंद झाला असे तिचे फॅन्स कमेंट करून तिला सांगत आहेत. या फोटोत रिंकूने छान साडी नेसली असून त्याला साजेसे दागिने घातले आहेत.

'सैराट'मधील आर्ची उर्फ रिंकू राजगुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तिने काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी खूपच कमी वेळात तिला सोशल मीडियावर खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे.

रिंकूने नुकताच तिच्या कुटुंबियाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि भाऊ यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोत तू खूपच सुंदर दिसत असून तुझ्या कुटुंबियांना पाहून आम्हाला आनंद झाला असे तिचे फॅन्स कमेंट करून तिला सांगत आहेत. या फोटोत रिंकूने छान साडी नेसली असून त्याला साजेसे दागिने घातले आहेत. तसेच त्यावर एकदम साधी हेअर स्टाईल केली आहे. 

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरूने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. रिंकूच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. त्यामुळे तिला तिचे चाहते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. 

Web Title: Sairat fame rinku rajguru family picture