फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? रिंकूसोबत आहे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:00 AM2023-03-23T08:00:00+5:302023-03-23T08:00:00+5:30

Marathi actor: एका अभिनेत्याने त्याच्या कॉलेज जीवनातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेत येत असून या अभिनेत्याचं रिंकू राजगुरुसोबत खास नातं आहे.

sairat fame marathi actor childhood photo viral on internet | फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? रिंकूसोबत आहे खास नातं

फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? रिंकूसोबत आहे खास नातं

googlenewsNext

सध्याचा काळ हा समाजमाध्यमांचा आहे त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील लहानसहान अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर, काही वेळा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  बालपणीचे वा कॉलेज जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.  यामध्येच एका अभिनेत्याने त्याच्या कॉलेज जीवनातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेत येत असून या अभिनेत्याचं रिंकू राजगुरुसोबत (rinku rajguru) खास नातं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो 'सैराट' (sairat) चित्रपटातील एका अभिनेत्याचा आहे. हा फोटो पाहून या अभिनेत्याची ओळख पटवणं तसं अवघड आहे. त्यामुळे हा कलाकार नेमका कोण हे शोधण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत.

आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको कधी पाहिलीये का? कलाविश्वाशी जराही नाही संबंध

आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo

नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या सैराट (sairat) हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यांच्या याच चित्रपटात या अभिनेत्याने काम केलं आहे. व्हायरल होत असलेला फोटो अभिनेता सुरेश विश्वकर्मा (suresh vishwakarma) यांचा आहे. सुरेश यांनी सैराट या सिनेमामध्ये आर्चीच्या म्हणजेच रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

सुरेश सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमधील अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामध्येच हा त्यांचा एक फोटो आहे. सुरेश यांचा हा फोटो कॉलेज जीवनातील आहे. "अस्मादिक...एफ.वाय.जे.सी.(अकरावी)", असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, सुरेश विश्वकर्मा हे सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटांमध्ये झळकले आहेत. तसंच त्यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
 

Web Title: sairat fame marathi actor childhood photo viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.