लडाखमध्ये काय करतोय 'सैराट' फेम आकाश ठोसर?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 06:30 IST2019-10-06T06:30:00+5:302019-10-06T06:30:00+5:30

‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारा आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारा परशा अर्थात आकाश ठोसर सध्या लडाखमध्ये आहे.

Sairat Fame Aakash Thosar is in Ladakh | लडाखमध्ये काय करतोय 'सैराट' फेम आकाश ठोसर?, जाणून घ्या याबद्दल

लडाखमध्ये काय करतोय 'सैराट' फेम आकाश ठोसर?, जाणून घ्या याबद्दल

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारा आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारा परशा अर्थात आकाश ठोसर सध्या कुठेय? तर सध्या तो लडाखला आहे. तिथे काय करतोय, हे अद्याप समजलेलं नाही. मात्र त्याने लडाखमधील पर्वतरांगा व निसर्गाच्या सानिध्यात एक्सरसाईज करताना दिसतो आहे.

आकाश ठोसरनं नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो एक्सरसाईज करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं की, कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी करतो व्यायाम


‘सैराट’मधील परशा आता खूपच हॅण्डसम झाला आहे. ‘सैराट’मध्ये परशा प्रचंड भाव खाऊन गेला. त्याचे डायलॉग, नाचणं आणि आर्चीवरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील परशा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनली. या सिनेमाने परशा अर्थात आकाश ठोसरचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. 


सैराट चित्रपटानंतर आकाश एफयूः फ्रेंडशीप अनलिमिटेड चित्रपटात झळकला. इतकंच नाही तर नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरिज वेबसीरिजमध्येही त्याने काम केले. त्यानंतर आता तो आणखीन एका वेबसीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.

हॉस्टस्टारच्या इंडो चीन वॉरवर आधारीत वेबसीरिज क्रश पॉइंटमध्ये तो दिसणार आहे. या वेबसीरिजचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.

या सीरिजमधील आकाशच्या भूमिकेबद्दल अद्याप काही समजू शकलेलं नाही.

Web Title: Sairat Fame Aakash Thosar is in Ladakh