इतकी प्रसिद्धी मिळूनही नागराज मंजुळे आजही राहातो इतक्या छोट्याशा घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:57 IST2019-12-04T10:40:19+5:302019-12-04T14:57:30+5:30

नागराजच्या गावी त्याचे हे घर असून तो आजही सोलापूरला गेल्यावर त्याच घरात राहतो.

Sairat Director Nagraj Manjule House Inside Photos | इतकी प्रसिद्धी मिळूनही नागराज मंजुळे आजही राहातो इतक्या छोट्याशा घरात

इतकी प्रसिद्धी मिळूनही नागराज मंजुळे आजही राहातो इतक्या छोट्याशा घरात

ठळक मुद्देनागराजच्या जेऊर या गावात त्याच्या वडिलांनी बांधलेले एक घर असून नागराज आजही गावी गेल्यानंतर त्याच घरात राहातो. नागराजचे हे घर पूर्वी खूपच साधे होते. पण सैराटच्या यशानंतर या घराला रंग देऊन त्याची डागडुजी नागराजने केली आहे.

नागराज मंजुळे सध्या त्याच्या झुंड या चित्रपटावर काम करत आहे. हा त्याचा पहिलाच हिंदी चित्रपट असून यात अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नागराज मंजुळेने आज मराठी इंडस्ट्रीत त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. मराठीप्रमाणेच हिंदीत देखील नागराजने आता एंट्री घेतली असून त्याच्या या चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षा आहेत.

नागराज मुंजुळेची पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याने फँड्री, सैराट यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. सैराट या चित्रपटाने तर आजवरचे मराठी चित्रपटांचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सैराट या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची गाणी, लोकेशन्स सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड भावले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या नाळ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची त्याने निर्मिती करण्यासोबतच या चित्रपटात काम देखील केले होते. 

नागराजने आज चांगलीच प्रसिद्धी मिळवली असली तरी आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. नागराज मुळचा सोलापूरचा असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात तो लहानाचा मोठा झाला आहे.

त्याच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्याचे वडील पोपटराव यांच्याकडून त्याचा भाऊ बाबूराव यांनी नागराजला दत्तक घेतले. नागराजला लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी तो अनेकवेळा शाळेला दांडी देखील मारत असे. नागराजने प्रचंड मेहनत घेऊन आज त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे.

नागराजच्या जेऊर या गावात त्याच्या वडिलांनी बांधलेले एक घर असून नागराज आजही गावी गेल्यानंतर त्याच घरात राहातो. नागराजचे हे घर पूर्वी खूपच साधे होते. पण सैराटच्या यशानंतर या घराला रंग देऊन त्याची डागडुजी नागराजने केली आहे.

Web Title: Sairat Director Nagraj Manjule House Inside Photos