सई ताम्हणकरची बहीण दिसते तिच्याच इतकी सुंदर, SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 14:37 IST2020-06-05T14:35:38+5:302020-06-05T14:37:16+5:30
सई ताम्हणकर आपल्या अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे.

सई ताम्हणकरची बहीण दिसते तिच्याच इतकी सुंदर, SEE PHOTO
रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री तर आहे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्साह असतो. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे.
सई सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. यावेळी शेअर केलेला फोटो खासच आहे. कारण सईने तिच्या बहिणीसह फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच रसिकांनी कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केला. दोघी बहिणींमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे.विशेष म्हणजे दोघांनीही साडी परिधान केली आहे. साडीमध्ये दोघांचेही सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
लॉक डाऊनदरम्यानही ती चाहत्यांसह तिच्या खास गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करत आहेत. सईनेदेखील इतरांप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान तिचा एक फोटो चाहत्यांसह शेअर केला होता. या फोटोत सईने कोणत्याही प्रकारचा मेकअप केला नसून तिचा हा फोटो विनामेकअपच होता. विनामेकअपमध्येही सई खूप सुंदर दिसते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणेच ऑफस्क्रीनलूकलाही सर्वाधिक पसंती मिळाली होती.