सई ताम्हणकरने साडीतील शेअर केले फोटो, म्हणाली - साडी आणि सोज्वळतेसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 16:30 IST2021-01-12T16:28:00+5:302021-01-12T16:30:01+5:30

हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sai tamhankar shared the photo of the saree photo | सई ताम्हणकरने साडीतील शेअर केले फोटो, म्हणाली - साडी आणि सोज्वळतेसोबत

सई ताम्हणकरने साडीतील शेअर केले फोटो, म्हणाली - साडी आणि सोज्वळतेसोबत

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सईने नुकतेच साडी परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने ग्रे रंगाची साडी परिधान केली आहे. साडी और सादगी के संग संग .. असं कॅप्शन सईने या फोटोंना दिले आहे.  फॅन्सनाही साडीमधला तिचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.

Web Title: Sai tamhankar shared the photo of the saree photo