बिकिनी घातल्यानंतर मला...; सई ताम्हणकरने सांगितलं 'तो' अनुभव कसा होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:24 IST2022-03-16T18:24:19+5:302022-03-16T18:24:37+5:30

Sai Tamhankar : ‘नो एंट्री, पुढे धोका आहे’ सिनेमात सईनी बिकिनी शॉट देऊन मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी सईच्या बिकिनी शॉटची चांगलीच चर्चा झाली होती.

sai tamhankar on wearing bikini for the first time in marathi film | बिकिनी घातल्यानंतर मला...; सई ताम्हणकरने सांगितलं 'तो' अनुभव कसा होता?

बिकिनी घातल्यानंतर मला...; सई ताम्हणकरने सांगितलं 'तो' अनुभव कसा होता?

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात ग्लॅमरस व हॉट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर (Sai Tamhankar)ओळखली जाते. तिच्या अभिनयाला तोड नाही. स्पष्टवक्तेपणासाठीही ती तेवढीच ओळखली जाते. सध्या सई चर्चेत आहे ती तिच्या एका व्हिडीओमुळे. होय, एका मुलाखतीचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे आणि यात तिने ऑनस्क्रीन बिकिनी घालण्याचा अनुभव शेअर केला आहे.

‘नो एंट्री, पुढे धोका आहे’ या  सिनेमात सईने बिकिनी शॉट देऊन मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटात बिकिनी घालण्याचा अनुभव एकंदर कसा होता? याबद्दल ती बोलली आहे.

‘जेव्हा मी बिकिनी परिधान केली, तेव्हा आश्चयार्ची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीने मोकळ्या मनाने माझं स्वागत केलं.  थोड्याप्रमाणात माझ्यावर टीकाही झाली,’ असं तिने ‘पिंकविला’ला दिलेल्या या मुलाखतीत सांगितलं. ‘मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात. ‘हंटर’नंतर मला त्या पद्धतीच्याच भूमिका येत होत्या. पण तीन वर्षानंतर ‘लव्ह सोनिया’ चित्रपट मिळाला. यातील भूमिका वेगळी होती म्हणून मी तो चित्रपट केला,’असंही तिने सांगितलं.
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल सांगायचं तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ती परीक्षक आहे. या कार्यक्रमात तिच्याबरोबर प्रसाद ओक देखील परीक्षक आहे. अलीकडे ‘मिमी’ या बॉलिवूड सिनेमात सई झळकली होती.

मोठी होईल तेव्हा याच्याशी लग्न करेल...
या मुलाखतीत सई तिच्या क्रशबद्दलही बोलली. ती म्हणाली,‘ मी आमिर खानची ( ेंं्र१ ‘ँंल्ल ) खूप मोठी फॅन होती. मी आईला लहानपणीच सांगितलं होतं की, मी  मोठी होईल तेव्हा याच्याशीच लग्न करेल.’पुढे याच आमिरसोबत सईला काम करण्याची संंधी मिळाली. ‘गजनी’ सिनेमात सईने आमिरसोबत काम केलं आहे. 
 

Web Title: sai tamhankar on wearing bikini for the first time in marathi film