काळ्या रंगाच्या साडीत सई ताम्हणकर दिसतेय खूपच सुंदर, पाहा तिच्या अदा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 19:00 IST2021-01-15T19:00:00+5:302021-01-15T19:00:02+5:30

भिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे.

Sai Tamhankar looks very beautiful in a black saree | काळ्या रंगाच्या साडीत सई ताम्हणकर दिसतेय खूपच सुंदर, पाहा तिच्या अदा !

काळ्या रंगाच्या साडीत सई ताम्हणकर दिसतेय खूपच सुंदर, पाहा तिच्या अदा !

सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. मकर संक्रांती निमित्त अभिनेत्री सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या साडीमध्ये विशेष फोटोशूट करुन सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. फॅन्सनाही साडीमधला तिचा हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच सईचा बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे.
 

Web Title: Sai Tamhankar looks very beautiful in a black saree