फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर, Video होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 01:17 PM2024-03-12T13:17:10+5:302024-03-12T13:17:59+5:30

सईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sai Tamhankar and Paparazzi Photographer conversation Video Viral | फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर, Video होतोय व्हायरल

फोटोग्राफरवर का फडकली सई ताम्हणकर, Video होतोय व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. सईने फक्त मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. सईने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. सई आणि तिच्या चाहत्यांचे अनेक किस्से, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच  सईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सई आणि पापराझी यांच्यामधील संवादाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. कपिल कारंडे या पापाराझी फोटोग्राफरने सईचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सईला 'मितवा'ची अभिनेत्री फोटोग्राफर समजला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, फोटोग्राफर सईला म्हणतो की, 'मॅम तुमचा आजच एक मुव्ही मी पाहिला मितवा'. हे एकताच सई तेथील फोटोग्राफर्सकडे पाहून म्हणते की, 'याचा फोन फोडू का मी? मी मितवा सिनेमात नाही आहे'. 

यावर सई त्याचा फोन खेचून घेते आणि त्याचंच शूटिंग करू लागते. यावर सई त्याला 'सांग मी कोणत्या सिनेमात होते?' असं विचारते. यावर तो म्हणतो 'स्वप्नील जोशीसोबत तुम्ही त्या सिनेमात होता, त्याच्या बायकोचं काम केलं आहे....' हा व्हिडीओ कपिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शन देत लिहलं की, "खरंतर मला 'तू ही रे' सिनेमाबद्दल बोलायचं होतं.

 एवढेच नाही तर कपिलनं व्हिडिओ शेअर केल्यावर त्यावर सईनं कमेंटही केली आहे. सईनं लिहलं, 'अगदी बरोबर, तू ही रे... आता कसं आठवलं?'. तर यावर कपिलं कमेंटमध्ये उत्तर देत लिहलं,  'आधीच आठवलं होतं मॅम, पण सुंदर सईला पाहून सर्वकाही विसरायला झालं'. यावर सईही त्याला ';चल चल' असे म्हणते.  सई आणि फोटोग्राफर कपिलचा हा मजेशीर संभाषण चाहत्यांच्या पंसतीस उतरतलं असून त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष २०२४ ची सईनं दमदार सुरुवात केली आहे. 'भक्षक' हा हिंदी आणि 'श्रीदेवी प्रसन्न' हा मराठी असे तिचे हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही सिनेमातील तिच्या भुमिकेचं जोरदार कौतुकही झालं.  तर लवकरच सई 'डब्बा कार्टेल' या नेटफ्लिक्सच्या हिंदी सीरिजमध्येही दिसणार आहे.
 

Web Title: Sai Tamhankar and Paparazzi Photographer conversation Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.