सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरचं 'पेट पुराण', जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:45 IST2022-04-20T18:45:13+5:302022-04-20T18:45:56+5:30

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचे 'पेट पुराण' (Pet Puraan) लवकरच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Sai Tamhankar and Lalit Prabhakar will be seen in 'Pet Puran' | सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरचं 'पेट पुराण', जाणून घ्या याबद्दल

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरचं 'पेट पुराण', जाणून घ्या याबद्दल

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या नक्की काय करतेय याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना नेहमीच असते. कधी ग्लॅमरस फोटो शूट, तर कधी एखाद्या वेगळ्या भूमिकेमुळे लाइमलाईटमध्ये ती राहत असते.  सई ताम्हणकरचे 'पेट पुराण' लवकरच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. पेट पुराणमध्ये सईसोबत अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राध्यानक्रमामधील संघर्ष दाखवणारी कथा 'पेट पुराण'मध्ये पहायला मिळेल. यात सईने आदितीची व्यक्तिरेखा साकारली असून, तिच्या जोडीला अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. या जोडप्याची मुले व कुटुंब नसण्याची इच्छा आहे. परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा अपारंपारिक व आगळावेगळा दृष्टीकोन आहे. याची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये ही सिरीज रिलीज होणार आहे. सोनी लिव्हवर ६ मे पासून ही सीरिज पाहायला मिळणार आहे. 

काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. तिने फोटो शेअर करत लाइफ पार्टनरबद्दल सांगितले. सई ताम्हणकर हिने फोटो शेअर केलेल्या व्यक्तीचं नाव अनीश जोग आहे. अनीश जोगचाही सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. तो सिनेनिर्माता असून त्याने आणि काय हवं? वेबसीरिज, गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड, डबल सीट, टाईम प्लीज आणि धुरळा या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Web Title: Sai Tamhankar and Lalit Prabhakar will be seen in 'Pet Puran'