बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शूटिंग करतेय सई ताम्हणकर, मराठी सिनेमाचा हा आहे रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 15:25 IST2019-11-12T15:10:04+5:302019-11-12T15:25:09+5:30

याआधी सई बॉलिवू़डच्या हंटर सिनेमात बोल्ड सीन्स देऊन चर्चेत आली होती.

Sai tamankar is shooting with bollywood actress kriti Sonnen | बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शूटिंग करतेय सई ताम्हणकर, मराठी सिनेमाचा हा आहे रिमेक

बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत शूटिंग करतेय सई ताम्हणकर, मराठी सिनेमाचा हा आहे रिमेक

सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. 


लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात सईची वर्णी लागल्याचे समजतेय. मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटवरचा क्रिती सॅनन सोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. यात सईची कोणती भूमिका असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  


हिंदी शिवाय सई लवकर 'पाँडेचेरी' या मराठीत सिनेमातदेखील दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. 


सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Sai tamankar is shooting with bollywood actress kriti Sonnen