​साहिल दिसणार लघुपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 18:44 IST2016-11-25T18:44:49+5:302016-11-25T18:44:49+5:30

 रिंगण या चित्रपटामध्ये अप्रतिम अभिनय करुन अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला छोटा अभिनेता साहिल जोशी लवकरच लघुपटात दिसणार असल्याचे समजतेय. ...

Sahil will appear in the short film | ​साहिल दिसणार लघुपटात

​साहिल दिसणार लघुपटात

 
िंगण या चित्रपटामध्ये अप्रतिम अभिनय करुन अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला छोटा अभिनेता साहिल जोशी लवकरच लघुपटात दिसणार असल्याचे समजतेय. साहिलने रिंगण या चित्रपटात महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. रिंगण या चित्रपटाला नॅशनल अ‍ॅवॉर्ड देखील मिळाला होता. राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचलेला साहिल आता प्रेक्षकांना हीरो नावाच्या एका लघुपटात दिसणार असल्याचे कळतेय. या लघुपटात साहिलची भूमिका काय असणार हे मात्र अजुनतरी गुलदस्त्यातच आहे. परंतू आता तो एका दमदार भूमिकेसाठी सज्ज झाला असल्याचे समजत आहे.

Web Title: Sahil will appear in the short film