मराठी कलाकारांचे संस्कार! सचित पाटील भर कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या पडला पाया, 'असंभव'च्या प्रिमियर सोहळ्यातील व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:47 IST2025-11-23T12:47:07+5:302025-11-23T12:47:44+5:30
'असंभव'च्या प्रिमियर सोहळ्यातील एका खास क्षणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी कलाकारांचे संस्कार! सचित पाटील भर कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या पडला पाया, 'असंभव'च्या प्रिमियर सोहळ्यातील व्हिडीओ
'असंभव' या रहस्यमय सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट हे त्रिकुट पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा प्रिमियर सोहळा पार पडला. या प्रिमियरला मराठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 'असंभव'च्या प्रिमियर सोहळ्यातील एका खास क्षणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'असंभव' या मराठी सिनेमाच्या प्रिमियरला अभिनेते अशोक सराफ यांनीही हजेरी लावली होती. अशोक सराफ येताच सचित पाटीलने त्यांचे आशीर्वाद घेतले. भर कार्यक्रमातच सचितने गुडघ्यावर बसून अशोक सराफ यांना नमस्कार करत त्यांच्या पाया पडला. प्रिमियर सोहळ्यातील हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर सचितचं सर्वत्र कौतुकही होत आहे. यातून सचितचे संस्कार दिसत असून त्याला चाहते जेन्टलमॅन म्हणत आहेत.
सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांचा 'असंभव' सिनेमा २१ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन सचित पाटीलने केलं असून सिनेमात त्याची मुख्य भूमिकादेखील आहे. सचित पाटील सोबत पुष्कर श्रोत्रीने 'असंभव'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. हा एक गुढ सिनेमा असून सिनेमाला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळतो आहे.