ऋतुजा बागवेनं स्वतःच्या कमाईतून खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 13:43 IST2023-04-01T13:42:01+5:302023-04-01T13:43:17+5:30

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये तिच्या हातात घराच्या किल्ल्या दिसत आहेत.

Rutuja Bagwe bought a new house with her own income, posted a video of the house entry and said... | ऋतुजा बागवेनं स्वतःच्या कमाईतून खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

ऋतुजा बागवेनं स्वतःच्या कमाईतून खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे(Rutuja Bagwe)चा समावेश होतो. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. आतापर्यंत तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता ऋतुजाने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी म्हणजे तिने नुकतेच नवीन घर घेतले आहे.

ऋतुजा बागवेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिच्या वाढदिवशी नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यादिवशी तिचे हे नवीन घर पहायला ती तिच्या कुटुंबियांसोबत गेली होती. त्यावेळचे फोटो तिने पोस्ट केले होते आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. आता तो फ्लॅट तिला मिळाला असल्याचे तिने सांगितले.

ऋतुजा बागवेने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये तिच्या हातात घराच्या किल्ल्या दिसत आहेत. तर त्यापाठी दारावर ऋतुजा बागवे असे नाव लिहिलेले आहे. हा फोटो पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, फ्लॅट मिळाला आता घर बनवायचंय.
या शिवाय तिने गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिचे आई-बाबा व तिच्या खास मित्रमंडळींबरोबर या तिच्या ड्रीम होममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिले, शाळेत असताना बाबा ५ रुपये पॉकिट मनी द्यायचे. ३ रुपये खर्च करुन २ रुपये पिग्गी बँकमध्ये ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता ५ रुपये पिग्गी बँकमध्ये टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, छोटे बलिदान, आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं.


ऋतुजा बागवेच्या या पोस्टनी आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऋतुजाने घेतलेलं हे घर तिने स्वकमाईतून घेतलेलं पहिलं घर आहे. त्यामुळे हे घर तिच्यासाठी नक्कीच तिच्यासाठी खास आहे. आता तिच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Web Title: Rutuja Bagwe bought a new house with her own income, posted a video of the house entry and said...