अस्सल मराठमोळ्या पदार्थावर रोहित शेट्टी मारतो ताव, कोणता महाराष्ट्रीयन पदार्थ तुला आवडतो? असा प्रश्न विचारता म्हणाला, मला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:51 IST2023-04-19T14:37:45+5:302023-04-19T14:51:24+5:30

लोकमत फिल्मीशी बोलताना रोहित शेट्टीने त्याला कोणत्या महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतो ते सांगितलं आहे.

Rohit Shetty love to eat this authentic maharashtrian dish | अस्सल मराठमोळ्या पदार्थावर रोहित शेट्टी मारतो ताव, कोणता महाराष्ट्रीयन पदार्थ तुला आवडतो? असा प्रश्न विचारता म्हणाला, मला...

अस्सल मराठमोळ्या पदार्थावर रोहित शेट्टी मारतो ताव, कोणता महाराष्ट्रीयन पदार्थ तुला आवडतो? असा प्रश्न विचारता म्हणाला, मला...

हिंदीतील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) पहिलाच मराठी सिनेमा 'स्कुल , कॉलेज आणि लाईफ'  प्रदर्शित झाला आहे. रोहित शेट्टीने निर्मित केलेला हा मराठी भाषेतला पहिलाच सिनेमा असलेल्यामुळे चाहत्यांमध्ये ही उत्सुकता  होती. यामध्ये सर्वांची लाडकी तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि अभिनेता करण परब मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या टीमने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. 

रोहित शेट्टी नुकताच त्याचा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आला. ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेले काही दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत होती. याचनिमित्त ‘लोकमत’च्या फिल्मी टीमसोबत त्याने त्याला आवडणारा मराठमोळा पदार्थ कोणता याचा खुलासा केला आहे.

यावेळी त्याला तुझा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ कोणता? असं विचारल्यावर रोहित म्हणाला, मला झुणका-भाकरी आणि ठेचा खूप आवडतो. रोहितचं हे उत्तर ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.

Web Title: Rohit Shetty love to eat this authentic maharashtrian dish