​ रितेशचा लुक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 17:38 IST2016-12-05T17:38:56+5:302016-12-05T17:38:56+5:30

 रितेश देखमुखच्या दुसºया मराठी चित्रपटाविषयी सध्या सिनेवर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. छत्रपती शिवाजी या चित्रपटामध्ये रितेश शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ...

Ritesh's look out | ​ रितेशचा लुक आऊट

​ रितेशचा लुक आऊट

 
ितेश देखमुखच्या दुसºया मराठी चित्रपटाविषयी सध्या सिनेवर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. छत्रपती शिवाजी या चित्रपटामध्ये रितेश शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सर्वांनाच माहितीय. या चित्रपटातील रितेशच्या लुकविषयी बरीच गोपनीयता पाळण्यात आली होती. परंतू आता रितेशचा या चित्रपटातील लुक व्हायरल झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपतींनी सामान्य मावळ्यांना एकत्र करुन जुलमी सत्तेच्या विरोधात उभा केलेला रोमहर्षक ऐतिहासिक रणसंग्राम मोठ्या पडद्यावर पाहायची संधी यामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून रितेशच्या चाहत्यांमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळत आहे. 'छत्रपती शिवाजी' चित्रपटाचे दुसरे पोस्टर रितेशने प्रदर्शित केले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रितेश छत्रपतींच्या प्रतिमेसह दिसला होता. यावेळी रितेशचा संपूर्ण चेहरा दुसºया पोस्टरमध्ये दिसत आहे. या चित्रपटासाठी रितेश बरीच मेहनत घेत असल्याचे देखील समजतेय. एवढेच नाही तर या सिनेमात केवळ रितेशच्या सांगण्यावरुनच सलमान खान काम करणार असल्याचे देखील बोलले जात होते.  या बातमीत किती सत्य आहे हे तर आपल्याला लवकरच समजेल. परंतू विवेक आॅबेरॉय देखील रितेशच्या मराठी सिनेमात झळकणार असल्याचे विवेकने स्वत: सांगितले होते. आता विवेक याच चित्रपटात आपल्याला मराठमोळ््या अंदाजात दिसणार का हे काही दिवसातच समजेल. परंतू या चित्रपटातील रितेशचा हा लुक अतिशय जबरदस्त दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे. सोशल साईट्सवर देखील रितेशच्या लुकला खुप लाईक्स मिळत आहे. या भव्य चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख करणार असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव याचे दिग्दर्शन करणार आहेत.


 

Web Title: Ritesh's look out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.