रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकणार,'माऊली' सिनेमाच्या शूटिंगचा लवकरच श्रीगणेशा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:25 IST2018-04-12T09:55:44+5:302018-04-12T15:25:44+5:30

हाथ भारी.... सगळंच लय भारी,या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं.मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा 'लय भारी' ...

Riteish Deshmukh will once again be seen in Marathi cinema, soon after shooting of 'Mauli' movie! | रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकणार,'माऊली' सिनेमाच्या शूटिंगचा लवकरच श्रीगणेशा !

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकणार,'माऊली' सिनेमाच्या शूटिंगचा लवकरच श्रीगणेशा !

थ भारी.... सगळंच लय भारी,या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं.मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा 'लय भारी' सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर आणि तरुणाईवर जादू केली होती.रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता. त्यामुळेच की काय या सिनेमाने तिकीट खिडकीवर कमाईचे नवनवे रेकॉर्ड्सही रचले होते.लय भारी सिनेमातील रितेशने साकारलेला 'माऊली' रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता.लय भारी या सिनेमाच्या यशामुळे रितेशच्या दुस-या मराठी सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागली होती.हिंदीत विविध सिनेमात झळकणारा रितेश मराठीत पुन्हा एकदा कधी दिसणार असा प्रश्न रसिकांना पडला होता.आता रसिकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.कारण रितेशचा दुसरा मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.'माऊली' असं या सिनेमाचं नाव असेल. 2014 साली लय भारी या सिनेमाच्या यशानंतरच या सिनेमाची घोषणा झाली होती.काही कारणामुळे सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होऊ शकली नाही.त्यामुळे आता रितेशच्या नव्या सिनेमाला मुहुर्त मिळाला आहे.लवकरच 'माऊली' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.खुद्द रितेशने याबाबतची माहिती दिली आहे. लय भारी सिनेमाने रसिकांच्या पसंती मिळवत नवा रेकॉर्ड रचला होता.त्यामुळे रसिकांच्या अपेक्षांना तडा जाऊ न देण्याची मोठी जबाबदारी असते.या सगळ्या गोष्टींचा विचार करुन काही तरी वेगळे घेऊन माऊली सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत असल्याचे रितेशने स्पष्ट केले आहे.'माऊली' या सिनेमात रितेश भूमिका साकारत असून या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे.या सिनेमाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून रितेशची निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे.त्यामुळे लय भारी रितेशच्या माऊली सिनेमाची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल.


2009 साली सुजॉयने रितेश देशमुखच्या अलाद्दीन या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.मात्र यानंतरही सुजॉयनं हार मानली नाही.त्यामुळेच 'कहानी','कहानी-2','टीई3एन' या सुजॉयनं दिग्दर्शित केलेल्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.दुसरीकडे रितेश देशमुख अभिनयासह निर्मात्याची भूमिकाही यशस्वीरित्या सांभाळत आहे.'बालक पालक','लय भारी,'फास्टर फेणे' अशा सिनेमांच्या माध्यमातून मराठी सिनेमाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात रितेश मोलाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे सुजॉय आणि रितेश मराठी सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत नवा चमत्कार करणार का याकडं आता रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Riteish Deshmukh will once again be seen in Marathi cinema, soon after shooting of 'Mauli' movie!