Riteish Deshmukh Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही चित्रपटाचं ‘वेड’, बूक केलं संपूर्ण थिएटर; रितेशनं सांगितला ‘तो’ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 08:27 AM2023-01-10T08:27:25+5:302023-01-10T08:27:58+5:30

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या 'वेड'ने  अक्षरश: नावाप्रमाणेच सर्वांना वेड लावलं आहे.

Riteish Deshmukh Ved movie super hit mns chief raj thackeray wife sharmila thackeray booked whole plaza theatre for movie show Genelia | Riteish Deshmukh Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही चित्रपटाचं ‘वेड’, बूक केलं संपूर्ण थिएटर; रितेशनं सांगितला ‘तो’ किस्सा

Riteish Deshmukh Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही चित्रपटाचं ‘वेड’, बूक केलं संपूर्ण थिएटर; रितेशनं सांगितला ‘तो’ किस्सा

googlenewsNext

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलियाच्या (Genelia) 'वेड'ने  (Ved Marathi Movie) अक्षरश: नावाप्रमाणेच सर्वांना वेड लावलं आहे. 'वेड' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला तरी याची लोकप्रियता वाढतच चालली आहे. रितेश जिनिलियाची क्युट जोडी, तुफान प्रमोशन आणि सुंदर गाणी यामुळे वेड प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतोय. दरम्यान, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बूक केलं.

“लहानपणापासून मी आई वडिलांसोबत प्लाझा थिएटरला यायचो. अशी ही बनवाबनवी मी इकडे पाहिला होता. यापूर्वी लय भारीसाठी या ठिकाणी आलो होतो. आता वेड हा चित्रपट महाराष्ट्रभर चालतोय. लोकांनीही उत्कृष्ट प्रतिसाद दिलाय. प्लाझामध्ये मध्ये एवढा मोठा शो अमेय खोपकर, शर्मिला वहिनींनी ऑर्गनाईज केलाय, याबद्दल खूप छान वाटतं. आपले प्रेक्षक आपला चित्रपट इतक्या प्रेमानं पाहतात तेव्हा मन भरून येतं,” असं रितेश देशमुखनं सांगितलं.

“राज ठाकरे सध्या व्यस्त आहेत. मी वहिनांनाही विचारलं आपण कधी चित्रपट पाहूया. तू मला शो मागितलेलास मी संपूर्ण थिएटरचं बूक केलंय आता असं त्या म्हणाल्या,” असं रितेशनं सांगितलं. राज ठाकरेंकडून कायम कौतुकही होतं, काही मुद्दे असले तर तेही सांगतात. त्यांचं क्रिटिकल टेक असतो. केवळ आमचेच नाही पण इतर चित्रपटही बसून चर्चा करतो तेव्हा ते दिसून येत असल्याचंही तो म्हणाला.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
“मला फार आनंद झालाय. आम्ही सातत्यानं भेटत असतो. मी कित्येक वर्ष झाले जिनिलिया रितेशला सांगतेय की परत या. तिला इतकी मोठी मुलं आहेत, लग्नाला दहा बारा वर्ष झाली हे तिच्या चेहऱ्यावरून कुठेही दिसत नाही. लय भारीतही तिनं एक गाणं केलं होतं आणि तिनं अख्खा चित्रपट खालला होता. मी तिला कायम सांगायची तू सोडू नको. आम्हाला पुन्हा एकदा चांगली अभिनेत्री मिळाली,” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Web Title: Riteish Deshmukh Ved movie super hit mns chief raj thackeray wife sharmila thackeray booked whole plaza theatre for movie show Genelia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.