लाडक्या लेकासाठी रितेश देशमुख बनला न्हावी, पत्नी जिनिलीयाने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:05 IST2023-12-11T15:02:22+5:302023-12-11T15:05:01+5:30

जेनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रितेश लाडक्या लेकाचे केस कापत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Riteish Deshmukh became a barber for his beloved daughter, wife Genelia shared the video | लाडक्या लेकासाठी रितेश देशमुख बनला न्हावी, पत्नी जिनिलीयाने शेअर केला व्हिडीओ

लाडक्या लेकासाठी रितेश देशमुख बनला न्हावी, पत्नी जिनिलीयाने शेअर केला व्हिडीओ

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे फक्त बॉलिवूडच नाही तर सोशल मीडियावरही सर्वांचे लाडके कपल आहे. ते त्यांच्या गोंडस केमिस्ट्री आणि मजेदार विनोदाने त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीही कमी पडत नाहीत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि रिल्सला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. ते दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात.  यातच रितेशचा आपल्या मुलासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

जेनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रितेश लाडक्या लेकाचे केस कापत असल्याचं पाहायला मिळत आहे.  जिनिलीयाने लिहले, रितेश आणि लेकाचा फोटो शेअर करत जिनिलीया लिहिते, 'जेव्हा मुलगा आपल्या बाबांकडे माझे केस कापून द्या असा हट्ट धरतो.. सगळ्या मुलांना फक्त आई-वडिलांचा थोडा वेळ हवा असतो. महागड्या गिफ्ट्सपेक्षा अशा प्रेमाची खूप जास्त गरज मुलांना असते'. व्हिडीओमध्ये रितेश ‘वेड’ चित्रपटाचं नाव लिहिलेल्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. 

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांनी जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. रितेश आणि जिनिलियाला रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत. अनेकदा रितेश-जिनिलियाने दोन्ही मुलांवर केलेले संस्कार स्पष्टपणे दिसून आले आहेत.पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर जेव्हा जेव्हा ही मुलं येतात, तेव्हा ते दोघेही हात जोडून उभे असतात. देशमुख जोडप्याची ही दोन्ही मुलं राहिल आणि रियान यामुळे प्रेक्षकांची फेव्हरिट आहेत. 
 

Web Title: Riteish Deshmukh became a barber for his beloved daughter, wife Genelia shared the video