लावणी किंग आशिष पाटीलसोबत रिंकू राजगुरूचा दिलखेचक डान्स! पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 14:57 IST2025-11-22T14:56:30+5:302025-11-22T14:57:19+5:30
अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) तिच्या अभिनयाने आणि खास करून 'सैराट' चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता रिंकू एका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

लावणी किंग आशिष पाटीलसोबत रिंकू राजगुरूचा दिलखेचक डान्स! पाहा व्हिडीओ
अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) तिच्या अभिनयाने आणि खास करून 'सैराट' चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता रिंकू एका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रिंकूने लावणी किंग आशिष पाटील (Ashish Patil) सोबत 'निगाहें मिलाने को जी चाहता है' या लोकप्रिय गाण्यावर दिलखेचक डान्स केला आहे. या गाण्यावरील तिच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर आशिष पाटील सोबतचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या व्हिडीओमध्ये रिंकूने ऑफव्हाइट रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे, ज्यात ती खूपच मोहक दिसत आहे. या लेहेंग्याला मॅचिंग असा आशिषनेही ऑफव्हाइट रंगाचा पोशाख परिधान केला आहे. डान्स करताना रिंकूने तिच्या दिलखेचक अदा दाखवल्या आहेत, ज्यामुळे हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
रिंकू राजगुरूने हा डान्स व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "बस गया है कोई इस दिल में कहें या ना कहें… माझी अपेक्षित नसलेली बाजू शेअर करत आहे...अगदी शेवटच्या क्षणी. फक्त दोन तासांच्या रिहर्सल आणि शूटिंगमध्ये माझ्यासोबत हे केल्याबद्दल आशिष पाटील तुमचे धन्यवाद." या पोस्टमधून तिने आशिष पाटीलचे आभार मानले आहेत की, त्याने अगदी अखेरच्या क्षणी फक्त दोन तासांच्या रिहर्सल आणि शूटिंगमध्ये तिच्यासोबत हा डान्स केला.
रिंकूचा वर्कफ्रंट
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तिने मराठीसोबतच हिंदी मनोरंजनसृष्टीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. 'सैराट'नंतर 'कागर', 'मेकअप' आणि 'झुंड' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने हिंदी वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे. सध्या रिंकू तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असून लवकरच ती नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.