गुलाबी साडीतल्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओसोबतच रिंकू राजगुरूच्या कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 11:35 IST2021-03-15T11:34:02+5:302021-03-15T11:35:29+5:30

रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

Rinku Rajguru's caption captivates fans with glamorous photo in pink saree | गुलाबी साडीतल्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओसोबतच रिंकू राजगुरूच्या कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष

गुलाबी साडीतल्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओसोबतच रिंकू राजगुरूच्या कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. 


रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत लिहिले की, सत्य नेहमी डोळ्यात दिसते. रिंकू राजगुरूच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 


तसेच याच साडीत तिने ब्लॅक अँड व्हाइट व्हिडीओ शेअर करत लिहिले हास्य हे खूप चांगली गोष्ट आहे जी कधीही परिधान करू शकतो. तिच्या या व्हिडीओलाही चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 


हल्ली रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. तिचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावतोदेखील आहे.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Rinku Rajguru's caption captivates fans with glamorous photo in pink saree