घरात राहून रिंकू राजगुरू करतेय स्वयंपाक, पाककौशल्याचे होतेय कौतुक... पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 10:47 IST2020-03-27T10:45:06+5:302020-03-27T10:47:09+5:30

प्रेक्षकांची लाडकी रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Rinku Rajguru turned into chef in quarantine PSC | घरात राहून रिंकू राजगुरू करतेय स्वयंपाक, पाककौशल्याचे होतेय कौतुक... पाहा हा व्हिडिओ

घरात राहून रिंकू राजगुरू करतेय स्वयंपाक, पाककौशल्याचे होतेय कौतुक... पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देया व्हिडिओत ती चक्क किचनमध्ये दिसत असून ती तिच्या आईला स्वयंपाक करताना मदत करत आहे. ती या व्हिडिओत चपात्या करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. सध्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू नाहीये. तसेच सगळे जीमदेखील बंद आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. 

सध्या सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. ते घरात राहून काय करत आहेत हे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगत आहेत.  केवळ बॉलिवूडचे सेलिब्रेटीच नव्हे तर मराठी इंडस्ट्रीतील कलाकार देखील सोशल मीडियाद्वारे ते घरात काय करत आहेत याची माहिती त्यांच्या चाहत्यांना देत आहेत आणि लोकांनी देखील घरातच राहावे हे आवाहन त्यांच्या चाहत्यांना करत आहेत.

आता प्रेक्षकांची लाडकी रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती चक्क किचनमध्ये दिसत असून ती तिच्या आईला स्वयंपाक करताना मदत करत आहे. ती या व्हिडिओत चपात्या करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत तिने तिच्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे. तिने या व्हिडिओसोबत एक कॅप्शन दिली आहे. तिने लिहिले आहे की, घरी रहा. आईला घरकामात मदत करा, पुस्तकं वाचा, फिल्म बघा, चित्रं काढा, व्यायाम करा... काळजी घ्या...

रिंकूचा हा व्हिडिओ पाहिल्यास ती अतिशय चांगल्या चपात्या लाटत असून तिच्या चपात्या फुलत देखील असल्याचे दिसून येत आहे. यावरून रिंकू एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक खूपच चांगली शेफ आहे असेच म्हणावे लागेल. रिंकूने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर केवळ काहीच तासांत ६० हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओतील हा रिंकूचा घरगुती अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे ते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

Web Title: Rinku Rajguru turned into chef in quarantine PSC