'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
By कोमल खांबे | Updated: December 28, 2025 11:09 IST2025-12-28T11:07:46+5:302025-12-28T11:09:23+5:30
'सैराट'मध्ये रिंकू आणि आकाशचे काही इंटिमेट सीन दिसले होते. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला.

'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
'सैराट' या सिनेमात आर्चीची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेली रिंकू राजगुरू आज मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या सिनेमामुळे रिंकू रातोरात स्टार झाली. पहिल्याच सिनेमाने तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. 'सैराट'मध्ये रिंकू आणि आकाशचे काही इंटिमेट सीन दिसले होते. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला.
रिंकूने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला 'सैराट'मधील किसिंग सीन करताना भीती नाही वाटली का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, "मी जेव्हा तो सीन ऐकला तेव्हा घाबरले होते. पण मला नागराज दादा म्हणाला होता की जसं दिसतं तसं करताना नसतं. खरं तर ते सीन करताना आम्ही दोघं हसत होतो. मला आता कळतंय की ती एक कॅमेरा मोमेंट होती. आणि मी आकाशच्या फक्त समोर होते. तो सीन करताना आम्ही फालतू गप्पा मारून हसत होतो. त्यामुळे ते वेगळं दिसत होतं. त्यामुळे भीती वाटली नाही. आम्ही सगळी मुलं ४ महिने एकत्र राहिलो होतो. त्यामुळे आमच्याच खूप कंम्फर्ट होता".
'सैराट'नंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा', 'मेकअप', 'झिम्मा २' या सिनेमांमध्ये ती दिसली. तर 'झुंड', '२०० हल्ला हो' या हिंदी सिनेमांमध्येही ती झळकली. आता 'आशा' या सिनेमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात तिने एका आशा वर्करची भूमिका साकारली असून तिच्या कामाचं सर्वत्र कौतुकही होत आहे.