रिंकू राजगुरूने शेअर केला सगळ्यात बोल्ड फोटो, पाहून प्रश्न पडेल हीच आहे का ती आर्ची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 13:03 IST2021-02-06T13:01:58+5:302021-02-06T13:03:23+5:30
रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण त्यानंतर काहीच मिनिटांत हा फोटो डीलिट केला.

रिंकू राजगुरूने शेअर केला सगळ्यात बोल्ड फोटो, पाहून प्रश्न पडेल हीच आहे का ती आर्ची?
सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला रिंकूचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. रिंकूचा हा फोटो पाहून ही सैराटमधील तीच आर्ची आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत आहे.
रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण त्यानंतर काहीच मिनिटांत हा फोटो डीलिट करून तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला. रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो अथवा व्हिडिओ डीलिट करण्याची ही पहिली वेळ नाहीये. तिने गेल्या काही दिवसांत अपलोड केलेला फोटो अथवा व्हिडिओ काहीच मिनिटांत डीलिट केलेला आहे. हे फोटो अथवा व्हिडिओ डीलिट करण्यामागे काय कारण आहे हे अद्याप कळलेले नाही.
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.