"मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही, डायरेक्ट...", रिलेशनशिपबद्दल रिंकू राजगुरू थेटच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:58 IST2026-02-10T14:57:50+5:302026-02-10T14:58:17+5:30
अनेकदा रिंकूने रिलेशनशिपबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. आताही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू रिलेशनशिपबाबत थेट बोलली आहे.

"मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही, डायरेक्ट...", रिलेशनशिपबद्दल रिंकू राजगुरू थेटच बोलली
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैराटमुळे रिंकू रातोरात स्टार झाली. या सिनेमात तिने साकारलेली आर्चीची भूमिका प्रेक्षक अजूनही विसरू शकले नाहीत. पण सैराटनंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही रिंकूने तिचं नशीब आजमावलं. रिंकूचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अनेकदा रिंकूने रिलेशनशिपबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. आताही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू रिलेशनशिपबाबत थेट बोलली आहे.
नव्या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूने भाडिपाच्या एका शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये रिंकूला तिच्या सिनेमाचे काही किस्से सांगायचे होते. तिच्या समोर तीन जण बसले होते. ज्यांना रिंकूने सांगितलेल्या या गोष्टीतून खोटं काय हे ओळखून दाखवायचं होतं. रिंकूने अतिशय मजेशीर पद्धतीने यात रंगत आणून सिनेमाच्या सेटवर घडलेले काही किस्से सांगितले. यावेळी रिंकूने समोर बसलेल्या मुलांची थोडी फिरकीही घेतली. "माझे डोळे खूप खतरनाक आहेत. डोळ्यात बघू नकोस, प्रेमात पडशील. भल्या भल्यांची वाट लागलीय", असं रिंकू तिच्या स्टाइलमध्ये म्हणाली. रिंकूसोबत डेटवर आल्यासारखं वाटतंय असं ते तिघं म्हणत होते. त्यानंतर अगदी मजेशीर पद्धतीने पण थेट रिंकू बोलली की "मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला...".
दरम्यान रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. अलिकडेच रिंकूचा आशा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तिने आशा वर्कर्सची भूमिका साकारली होती. 'झिम्मा २', 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा', 'मेकअप' यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 'झुंड', '२०० हल्ला बोल' या हिंदी सिनेमांमध्येही ती दिसली होती.