रिंकू राजगुरूनं शेअर केली एक क्रिप्टिक पोस्ट, आर्चीच्या 'त्या' नात्याला घरच्यांचा आहे विरोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:30 IST2026-01-05T12:27:45+5:302026-01-05T12:30:31+5:30
रिंकू राजगुरूच्या 'या' नात्याला घरच्यांचा विरोध! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्चीने सांगितली 'मन की बात'

रिंकू राजगुरूनं शेअर केली एक क्रिप्टिक पोस्ट, आर्चीच्या 'त्या' नात्याला घरच्यांचा आहे विरोध!
Rinku Rajguru : आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कायम चर्चेत असते. ती आज मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रिंकूची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही तितकीच प्रभावी आहे. ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी चित्रपटांचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचं लक्ष असतं. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर टाकलेलं एक स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या रिंकूने शेअर केलेली एक इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. रिंकूने नुकतीच एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मला माझी झोप खूप आवडते आणि माझ्या झोपेलाही मी आवडते. पण माझ्या कुटुंबाला हे नातं आवडत नाही". रिंकूच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होतंय की, तिला झोप घ्यायला खूप आवडतं.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'आशा' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'आशा'नंतर रिंकू आता बहुप्रतीक्षित 'पुन्हा साडे माडे ३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.