नो मेकअप फक्त लिपस्टीक लावलेला रिंकु राजगुरुने फोटो केला शेअर, पाहून चाहते फुल टू फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:59 IST2021-05-31T11:52:19+5:302021-05-31T11:59:43+5:30

विना मेकअप लूकमध्ये देखील रिंकू राजगुरु तेवढीच सुंदर दिसते. ब्लॅक आणि व्हाईट शेडमध्ये रिंकूने हे फोटो क्लिक केले आहेत.

Rinku Rajguru flaunts her no make-up look | नो मेकअप फक्त लिपस्टीक लावलेला रिंकु राजगुरुने फोटो केला शेअर, पाहून चाहते फुल टू फिदा

नो मेकअप फक्त लिपस्टीक लावलेला रिंकु राजगुरुने फोटो केला शेअर, पाहून चाहते फुल टू फिदा

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतेच काही नवीन फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. या फोटोमधील रिंकूचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या  फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. 


रिंकू या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे रिंकूने फोटोवेळी अजिबात मेकअप केलेला नाही, फक्त लिपस्टीकचा वापर केला आहे. विना मेकअप लूकमध्ये देखील रिंकू तेवढीच सुंदर दिसते. ब्लॅक आणि व्हाईट शेडमध्ये रिंकूने हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोत सिम्पल आणि सोबर साडी तिने परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

 


 या साडीत रिंकूचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे नॅचरल ब्युटी म्हणत चाहते तिच्या या फोटोला कमेंट्स देत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडिावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे साडीमधील फोटो जास्त पाहायला मिळतील.

 

 

रिंकूला साडी नेसायला फार आवडते हेच यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ती साडीमध्ये खास फोटोशूट करताना दिसते. तिच्या चेह-यावर कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांत रिंकूने तिचे विनामेकअप लूकचं जास्त शेअर केले आहेत.

Web Title: Rinku Rajguru flaunts her no make-up look